Pune News: स्वामी विवेकानंदांच्या वैज्ञानिक दृष्टीचा पश्चिमात्य देशांचा प्रभाव -जयंत सहस्रबुद्धे

एमपीसी न्यूज – डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तानंतर पाश्चिमात्य देशात धर्म की धुनिक विज्ञान असा संघर्ष निर्माण झाला होता. त्या काळात स्वामी विवेकानंद यांनी कोलंबिया वर्ल्ड एक्सपो मध्ये भारतीय धर्म व नव विज्ञान कसे एकत्र आहेत याचे तत्वज्ञान मांडले. त्यामुळे पाश्चिमात्य देशांत निर्माण झालेली पोकळी भरून निघाल्याने स्वामी विवेकानंद यांच्या वैज्ञानिक दृष्टीचा पश्चिमात्य देशांचा प्रभाव आजही दिसून येतो, असे प्रतिपादन विज्ञान भारतीचे संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांनी  केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) संस्थापक दिनानिमित्त आयोजित ‘स्वामी विवेकानंद आणि विज्ञान’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये जयंत सहस्त्रबुद्धे बोलत होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले व कार्यवाह धनंजय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

जयंत सहस्रबुद्धे म्हणाले, “पश्चिमी देशांमध्ये १८व्या शतकात विश्वाच्या निर्मितीत धर्म सत्य की विज्ञान यावर चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे विज्ञान हेच श्रेष्ठ मानले जावू लागले. यामुळे पाश्चिमात्य देशात संघर्ष सुरू झालेला असताना जागतीक पातळीवर धर्मपरिषद घेण्याचा निर्णय झाला. या कोलंबिया वर्ल्ड एक्सपो या परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद यांना निमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेत तत्वज्ञानावर आधारीत विवेकानंदांचा अनेक भाषणे झाली. एका भाषणात त्यांनी ‘ हिंदूत्वाचे तत्वज्ञान’ यावरील शोधपत्र सादर केले होते. वेद आणि आधुनिक विज्ञान एकत्र कसे आहेत याचा सिद्धांत मांडला. जसे विज्ञानाचे लक्ष एकत्व शोधणे आहे तसेच हिंदू धर्म विविधतेत एकता बघणारा आहे. आमच्या देशात हीच जीवनपद्धती आहे असे विवेकानंदांनी १८९३ मध्ये मांडले.

पाश्चिमात्य देशात धर्म व विज्ञान स्वतंत्र होते, पण विवेकानंदांनी केलेल्या मांडणी मध्ये धर्माचा विचार विज्ञानाकडे घेऊन जाणारा आहे हे मांडल्याने तेथील लोकांना नवा विचार मिळाला. त्याचा प्रत्यय जही येतो, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

आपल्या देशात मागे पडल्याची खंत
पाश्चिमात्य देशांत हिंदू तत्त्वज्ञान स्वीकारले जात असताना आपला देश आधुनिक विज्ञानात मागे पडला आहे, या विज्ञानाची गरज आहे असे विवेकानंदांना वाटत होते. अमेरिकेला जाताना विवेकानंद आणि जमशेटजी टाटा यांची भेट झाली होती, त्या भेटीतूनच बेंगलोर येथील इंडीयन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था उभा राहिली. यासाठी विवेकानंद यांची शिष्य भगिनी निवेदिता आणि जमशेटजी टाटा यांचे पुत्र दोराबजी टाटा यांनी पुढाकार घेतला होता.” असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.