Pune : लहान मुलांना विज्ञानाच्या गंमतीदार प्रयोगांचे प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण करून दिली माहिती

जागतिक बाल हक्क दिन सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया च्या स्मक टीम तर्फे आयोजन

एमपीसी न्यूज – जागतिक बाल हक्क दिन या दिनानिमित्त सेव्ह द चिल्ड्रेन इंडियाच्या स्मक टीम तर्फे लहान मुलांसाठी विज्ञानाचे गंमतीदार प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच या प्रत्येक प्रात्यक्षिकात केवळ मुलांसह शिक्षक, मुख्याध्यापक यांनीही सहभाग घेतला. याच प्रयोगातून बाल अधिकार आणि हक्क यांची माहितीसुद्धा मुलांपर्यंत पोहचवली आहे.

सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया स्मक प्रोग्राम व पन्नालाल लुंकड चैरीटी ट्रस्ट संचालित उज्वल विद्यानिकेतन, तळजाई, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्मक (सायन्स मॅथ अप्लिकेशन ऑफ नॉलेज)चे मेंटोर सोमनाथ हुचगोळ यांनी त्यांच्या टीमचे वैशाली जावळे आणि शाहीन खान यांनी मिळून हवेचा दाब, आम्ल आम्लारीमधील रंगाची किमया, पाण्याचा थर्मामीटर, असे वेगवेगळे विज्ञान प्रात्यक्षिके दाखवून त्यामधील होणारी शास्त्रीय माहितीसुद्धा दिली.

मुलांना यामधून आनंद मिळाला असून अधिक माहितीही मिळाली असा अभिप्राय त्यांनी दिला आहे.

सोमनाथ हुचगोळ यांनी आपल्या बाल हक्क दिनाच्या मनोगतात म्हणाले, “लहान मुले ही देवाघरची फुले असे म्हटले जाते. शारीरिक व मानसिक अपरिपक्वतेमुळे या फुलांची अधिक काळजी व संगोपन करावे लागते.त्याचप्रमाणे त्यांना कायद्यान्वये संरक्षणही द्यावे लागते. आजही आपण स्त्री भृणहत्या, बालकामगार, बालविवाह इ. समाजामध्ये घडतांना बघतो. ह्या समस्यांवर मत करण्यासाठी बालकांची जात, वर्ण,लिंग,भाषा,धर्म यांचा विचार
न करता जगातील प्रत्येक बालकाला सर्वांगिण विकासाचा हक्क असून त्याला सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने 20 नोव्हेंबर 1959 ला बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा प्रस्तुत केला आणि तेव्हापासून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो

शिक्षिका शाहीन खान यांनी चार मुख्य अधिकार आहेत त्यापैकी 1) जगण्याचा अधिकार 2) विकासाचा अधिकार यांची माहिती मुलांना दिली. लहान मुले ही कोवळी व निरागस असतात .त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होणे कठीण असते व त्यांचे उल्लंघन झाले आहे हे समजणे अधिक कठीण असते. असे मत व्यक्त केले.

तसेच 3) सुरक्षिततेचा अधिकार 4) सहभागाचा अधिकार याची माहिती शिक्षिका वैशाली जावळे यांनी मुलांना याबाबतची जागृती केली.या अधिकारांची ओळख सुद्धा 2 मुले आणि 2 मुलांनी आपल्या विज्ञानच्या आम्ल आणि आम्लारी अभिक्रिया यांच्याद्वारे सुरुवात करून केली. यामधून त्यांना खूपच वेगळा अनुभव मिळाला आहे.

पन्नालाल लुंकड चैरीटी ट्रस्ट संचालित उज्वल विद्यानिकेतन, शाळेतील सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया च्या पतंग शिक्षिका शिवकन्या शिंदे यांनी संयोजन केले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष शिळमकर सरांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. तसेच इयत्ता 5 वीचे वर्गशिक्षक श्री गणेश साळुंखे सर आणि इयत्ता 6 वीचे वर्गशिक्षक श्री रविन्द्र बारगजे यांचे हि सहकार्य लाभले.

याचबरोबर सेव्ह द चिल्ड्रेन इंडियाच्या प्रकल्प अधिकारी शिप्रा जैन व प्रकल्प व्यवस्थापक सुमित सोनावळे यांचे या उपक्रमासाठी बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.