Pune: इन्फोसिस फाऊंडेशनकडून पुण्यासाठी चार व्हेंटिलेटर्सची मदत

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या आवाहनानुसार कोरोना साथ नियंत्रणासाठी विविध संस्था आणि व्यक्तींकडून आर्थिक आणि वस्तू रुपाने मदत मिळत असून इन्फोसिस फाऊंडेशनकडून चार व्हेंटिलेटर्स व चार मॉनिटर्सची मदत मिळाली आहे. अमानोरा संस्थेकडून एक हजार मास्कस् भेट देण्यात आले आहेत.

पालिकेच्या पथ विभागाचे कार्यकारी अभियंता भारत दिगंबर मोहिते यांनी छत्तीस हजार रुपये, पार्क इन्फोनियाचे (फुरसुंगी) संदीप सुदाम कुंजीर यांच्याकडून अकरा हजार रुपये, राजीव बासरगेकर यांच्याकडून अडीच हजार रुपयांची मदत प्राप्त झाली आहे.

या रकमेतून डॉ.नायडू रुग्णालय आणि बोपोडीतील खेडेकर रुग्णालय यांच्यासाठी वैद्यकीय साधनसामग्री खरेदी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.