_MPC_DIR_MPU_III

Pune : कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारार्थ नवले व राव रुग्णालयांचा पुढाकार ; 87 बेड्सची होणार सोय

एमपीसी न्यूज – कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बिबवेवाडी येथील राव नर्सिंग होम व नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांनी पुणे महानगरपालिकासह “सामंजस्य करारावर”,सह्या केल्या. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी 87 बेड्सची सोय होणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

राव नर्सिंग होम यांच्यावतीने डॉ. हरिषचंद्र साखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश गरदास यांनी व श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या वतीने येथील अधिष्ठाता डॉ. शालिनी प्रवीण सरदेसाई व डॉ. मधुकर जगताप, पुणे महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रुबल, डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.

याप्रसंगी सहाययक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे व अन्य अधिकारी उपस्थित होते. या हॉस्पिटलमार्फत शहरातील पुणे मनपाने शिफारस केलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णरुग्णाच्या उपचारासाठी ३५ बेड आरक्षित करण्यात येतील.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना रुग्णांवर शासनाच्या नियमानुसार औषधोउपचार करणे, पुणे मनपा कार्यक्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांना मनपाच्या अंशदायी वैद्यकीय योजनेच्या दराप्रमाणे औषधोउपचार करणे, मनपा कार्यक्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या बिलांची पूर्तता पुणे मनपाने तीन महिन्यात करणे, मनपाने रुग्णालयास सुरवातीपासून पीपीई किट्स, N-95, मास्क पुरविणे, रुग्णालयातील मनुष्यबळ, औषधे, उपकरणे व इतर साधनसमुग्रीची जबाबदारी रुग्णालयाची राहील.

तर कर्मचारी वर्ग, डॉक्टर यांचे वेतन, मानधन, विमा, औषधे व उपकरणे यांच्या खर्चाची जबाबदारी रुग्णालयांची राहील. रुग्णालयांची सुरक्षा सेवा, स्वच्छता सेवा, निर्जंतुकीकरण, जैविक कचरा व्यवस्थापन याबाबतीत संपूर्ण जबाबदारी रुग्णालयाची राहील, असे या करारात नमूद करण्यात आले आहे.

या सामंजस्य कराराचा कालावधी हा सहा महिन्यांचा आहे. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, आरोग्य आणीबाणी अशा नैसर्गिक कारणामुळे अपयशास किंवा विलंबास कोणताही पक्ष जबाबदार राहणार नाही, या अटी शर्ती दोन्ही रुग्णालयाकरिता आहेत.

श्रीमती काशीबाईं नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्यावतीने कोरोना ग्रस्त रुग्णांचे उपचाराकरित ५० आयसोलेशन बेड व २ आयसीयु बेड आरक्षित ठेवण्यात येतील.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.