Pune : येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज – मागील दहा महिन्यांपासून येरवडा कारागृहात (Pune)बंदिस्त असलेल्या एका मनोरुग्ण कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

मंगेश विठ्ठल भोर (वय 30, रा. जुन्नर, पुणे) असे आत्महत्या केलेल्या बंद्याचे नाव आहे.

Dighi : इन्स्टंट लोन ॲप वरील कर्ज भरण्यासाठी पठ्ठ्याने स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव

याबाबत माहिती अशी की, मंगेश भोर याने आईला (Pune)मारहाण केली होती. त्याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात त्याला अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. जुलै 2023 पासून तो येरवडा कारागृहात बंदिस्त होता. दरम्यान त्याच्या आईने त्याच्या जामीनासाठी प्रयत्न केला नाही. तसेच आईने गुन्हा मागे घेतला नाही. त्यामुळे मंगेश हा मानसिक तणावात होता.

कारागृह मानसोपचार तज्ञांच्या निगराणी खाली त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते. दरम्यान, त्याने येरवडा कारागृहात यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कारागृह विभागातील अंमलदारांच्या प्रसंगावधानामुळे त्याला वाचवण्यात यश आले होते. सोमवारी त्याने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यास वाचवण्यात यश आले नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.