Pune : वरिष्ठ सनदी अधिकारी सचिंद्र प्रतापसिंग यांनी केली कामगार पुतळा परिसराची पाहणी

Pune: Senior IAS Officer Sachindra Pratap Singh inspected the Kamagar Putala Area

एमपीसी न्यूज – कामगार पुतळा, स्व. राजीव गांधीनगर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी भेट दिली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.

याप्रसंगी महापालिका उपायुक्त नितीन उदास, क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे, विभागीय आरोग्य निरीक्षक इनामदार व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत महापालिका सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार कामगार पुतळा झोपडपट्टी व राजीव गांधीनगर, जुना तोफखाना येथील नागरिकांना मेगा फोनद्वारे कोरोनाबाबत जन जागृती करण्यात आली.

नागरिकांना मास्क वापरणे, सॅनिटायझर, साबणाचा वापर करणे, स्वच्छता राखणे, सोशल डीस्टन ठेवणे याबाबत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आय. एस. इनामदार यांनी नागरिकांना कोरोनाबाबत सूचना देण्यात आल्या.

स्व. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ढोले पाटील चौकातील महात्मा फुले शाळेत नागरिकांचे घशातील स्त्रावाचे ( स्वाब ) नमुने घेण्याकरिता स्वाब सेन्टर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे यांनी दिली.

येरवडा परिसरातील गणेशनगर, गांधीनगर, जयप्रकाशनगर येथील नागरिकांना सुमारे १५०० मास्क वितरित करण्यात आले आहे, असे क्षेत्रीय अधिकारी राजेश बनकर म्हणाले. दरम्यान, पुणे शहरतील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.