Pune: भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी 

Pune: Inspection of Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College site कमीत कमी कालावधीत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील असून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या माध्यमातून आणि आपल्या संकल्पनेतून साकारत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली जागा, तूर्त उपलब्ध असलेली जागा, कर्मचारी निवासाचे स्थलांतर आणि अतिक्रमण अशा विविध मुद्द्यांवर प्रत्यक्ष पाहणी करुन चर्चा केली. कमीत कमी कालावधीत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील असून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, उपायुक्त राजेंद्र मुठे, विजय दहिभाते, अविनाश सकंपाळ, सुनील इंदलकर, माधव जगताप, शिवाजी लंके, अंजली साबणे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय सल्लागार कंपनी अधिकारी व अनेक मनपा अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष असताना मुरलीधर मोहोळ यांनी या वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा केला होता. सातत्याने त्यांनी याविषयी आवाज उठविला.

महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असावे, यासाठी मोहोळ आग्रही आहेत. राज्य शासनाकडेही त्यांनी पत्रव्यवहार केला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या जागेची पाहणी ठेवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.