Pune: खाटांची संख्या वाढवण्यापेक्षा, नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवा -आबा बागूल

Pune: Instead of increasing the number of beds, increase the immunity of the citizens: Aba Bagul

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांसाठी कितीही बेड वाढवले तरी ही संख्या कमी करण्याशिवाय पर्याय नाही. बेड वाढवणे अंतिम पर्याय असू शकत नाही. त्यापेक्षा नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढवा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

मागील दोन महिन्यांपासून आपण हे निदर्शनास आणून देत आहे. कोरोना होऊ नये यासाठी प्रत्येक ओपीडी, जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर किंवा पुणे महानगरपालिकेकडून सर्वत्र प्रभाग निहाय छोटछोट्या ओपीडी काढून प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे वाटणे अत्यंत गरजेचे आहे. सी व्हिटॅमिन मल्टीविटामिन, होमिओपॅथी, आयुर्वेदिक गोळ्या वाटणे देखील अत्यंत गरजेचे आहे, अशी सूचना बागूल यांनी केली आहे.

हा कोर्स कमीत कमी दोन ते तीन महिने दररोज आपण देणे गरजेचे आहे. एकदम गोळ्या देणे शक्य नसल्यास नागरिकांना आठ दिवसाचा कोर्स देऊन प्रतिकारशक्ती वाढवून नागरिकांना कोरोनापासून लांब ठेऊ शकतो. त्यासाठी परिपत्रक काढून, जाहिरात करून, रेडिओ, टेलिव्हिजनद्वारे नागरिकांना जागृत करणे गरजेचे आहे, असेही आबा बागूल यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पुणे शहराची लोकसंख्या सुमारे 40 लाख असून शहरात एक लाख बेड तयार केले तरी वाढती रुग्ण संख्या पाहता हे बेड पुरतील ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. बेड तयार करणे हा महत्वाचा भाग आहे. त्यामध्ये ऑक्सिजन सेंटर व व्हेंटिलेटर सेंटर यावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. covid-19 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नागरिकांमध्ये होऊ नये यासाठी वेगळी यंत्रणा करणे आता गरजेचे झाले आहे. त्यामुळे आपण पुणेकरांना वाचवू शकतो. कोरोनाची लागण झाल्यास ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यूचे प्रमाण जास्त होते. आता 30 ते 40 वयोगटातील तरुण देखील कोरोनाने दगावत आहेत, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.