Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे काम करण्याऐवजी रंगले राजकारण

Pune: Instead of working together on the backdrop of corona, playing politics आगामी काळात कोरोनाचे संकट लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 10 टक्के भांडवली कामांना कात्री लावली. त्यातून आणखी 200 कोटी रुपये तरतूद केली.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ते कमी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असताना राजकारणच रंगले आहे.

पुणे महापालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 125 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. मग रुग्ण आटोक्यात का येत नाही, नेमक्या काय उपाययोजना केल्या, हा खर्च कसा केला, याचा हिशोब काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे हे विरोधी पक्ष भाजपला मागत आहे.

या संकट काळात सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन चांगले काम करीत असून,  त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक असल्याचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी निक्षून सांगितले.

आगामी काळात कोरोनाचे संकट लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 10 टक्के भांडवली कामांना कात्री लावली. त्यातून आणखी 200 कोटी रुपये तरतूद केली.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेला आधी प्राधान्य देण्यात येत आहे. पुढील काळातही पुणेकरांच्या आरोग्य सेवेकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

या संकट काळात विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी उपाययोजना सुचविण्या ऐवजी राजकारणच मोठ्याप्रमाणात रंगत असल्याचे चित्र दिसून आले. 98 नगरसेवकांचे पद धोक्यात आले असल्याने सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मात्र, विरोधी पक्षांनी त्यातही कोरोनाचे राजकारण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.