Pune : आझम कॅम्पसमध्ये 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

दोन हजार विद्यार्थी – विद्यार्थिनी योग प्रात्यक्षिके सादर करणार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे शुक्रवारी (दि. 21)सकाळी 7 वाजता ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ चे आयोजन करण्यात आले आहे. एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

दोन हजारहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनी फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. त्याचा सराव सुरु असल्याचे ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’चे संचालक गुलझार शेख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.