Pune : आगामी विधानसभेसाठी काँग्रेसकडून पिंपरीतून चार तर, चिंचवडमधून तीन उमेदवारांच्या मुलाखती

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आघाडी म्हणून लढणाऱ्या काँग्रेसने एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा सुरु केली, असे असताना दुसरीकडे राज्यभरातील सर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आज पिंपरी-चिंचवड मतदार संघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुण्यातील कॉंग्रेस भवन येथे झाल्या.

येत्या ऑक्‍टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.

  • यावेळी काँग्रेसचे राजेश शर्मा, माजी खासदार जयंत आवळे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी माजी मंत्री जयंत आवळे म्हणाले की, उमेदवारी कोणालाही मिळो सर्वांनी एकजुटीने पक्षासाठी लढत रहा. एकजुटीने कामे करा.

पिंपरीमधून मनोज कांबळे, गौतम आरकडे, सुंदर कांबळे, बाबा बनसोडे तर चिंचवडमधून सचिन साठे, संदेश नवले, परशुराम गुंजाळ यांच्या मुलाखती झाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.