Pune : आयपीएचतर्फे बुधवारी स्किझोफ्रेनिया- शुभंकर व शुभार्थी स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच)यांच्या वतीने बुधवारी (दि.५) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्किझोफ्रेनिया- शुभंकर व शुभार्थी स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थतर्फे प्रत्येक महिन्याच्या बुधवारी स्किझोफ्रेनिया – शुभंकर व शुभार्थी स्वमदत गटाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ‘शुभंकरांचे मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर गटात सहभागी होणाऱ्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण व चर्चा केली जाणार आहे. या गटातला सहभाग विनामूल्य आहे.

हा कार्यक्रम इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, प्लॉट क्रमांक 4, यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर ,पुणे येथे संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.