_MPC_DIR_MPU_III

Pune : आयपीएचतर्फे बुधवारी स्किझोफ्रेनिया-शुभंकर व शुभार्थी स्वमदत गट

एमपीसी न्यूज- आयपीएच तर्फे बुधवारी (दि. 31) संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत स्किझोफ्रेनिया-शुभंकर व शुभार्थी स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी स्किझोफ्रेनिया- शुभंकर व शुभार्थी स्वमदत गट जमतो. मात्र नोव्हेंबर महिन्यात त्या दिवशी दिवाळी असल्याने, नोव्हेंबर महिन्याचा गट ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. 31) जमणार आहे. या स्वमदत गटात ‘शुभंकरांचे मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर अनुभवांची देवाणघेवाण व चर्चा होईल.

हा कार्यक्रम विनामूल्य असून इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे या ठिकाणी होणार आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.