Pune : आयपीएच तर्फे शुक्रवारी OCD (मंत्रचळ) शुभंकर व शुभार्थी गटाचे आयोजन

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे उद्या, शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत परफेक्ट- OCD (मंत्रचळ) – शुभंकर व शुभार्थी स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी परफेक्ट- OCD (मंत्रचळ)- शुभंकर व शुभार्थी स्वमदत गटाचे आयोजन करण्यात येते. या शुक्रवारच्या स्वमदत गटाचा विषय आहे, OCD – आहार व जीवनशैलीतील बदल.

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चौथा बंगला ) या ठिकाणी हा स्वमदत गट होणार आहे.

या गटातला सहभाग विनामूल्य असून जास्तीतजास्त संख्येने या स्वमदत गटाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.