Pune : आयपीएचतर्फे सोमवारी व्यसनमुक्त व त्याच्या कुटुंबियांच्या स्वमदत गटाचे आयोजन

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) आणि मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी संध्याकाळी 6 वाजता व्यसनमुक्त व त्याच्या कुटुंबियांच्या स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व्यसनमुक्त व त्याच्या कुटुंबियांच्या स्वमदत गटाचे आयोजन करण्यात येते. या शुक्रवारच्या स्वमदत गटाचा विषय आहे ‘समजूतदारपणाचे रहस्य’. या विषयावर मनोविकासतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चौथा बंगला ) या ठिकाणी हा स्वमदत गट होणार आहे.

या गटातला सहभाग विनामूल्य असून जास्तीतजास्त संख्येने या स्वमदत गटाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.