Pune : आयपीएचतर्फे सोमवारी मधुस्नेह – डायबेटीस स्व-मदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) व KEM हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 10) मधुस्नेह – डायबेटीस स्व-मदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) व KEM हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मधुस्नेह – डायबेटीस स्व-मदत गट आयोजित केला जातो. डायबेटीसचे निदान झाले की व्यक्तीला अनेक जणांकडून अनेक सूचना सुरु होतात ‘हे खा, ते खाऊ नका’, ‘…वेळेला —प्रमाणात खा’, ‘…ची आहार पद्धत वापरा’, इ. ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनात कधीकधी परस्पर विरोधी असलेल्या माहितीमुळे गोंधळ उडतो व आहार नक्की कसा घ्यावा हे ठरवता येत नाही.

याच प्रश्नांवर बोलण्यासाठी व योग्य/अयोग्य काय ते जाणून घेण्यासाठी या बैठकीत आपण ‘डायबेटीस व आहार’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, प्लॉट क्रमांक 4, यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर ,पुणे येथे संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.