Pune : इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ तर्फे मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अवांतर’ अभ्यास गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे मानसशास्त्राच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी, एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘अवांतर’ अभ्यास गटात कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाव्यातिरिक्त पण त्या अभ्यासाला पूरक अशा विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन व चर्चा आयोजित करण्यात येणार आहे.

मानसशास्त्राच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा अभ्यास गट विनामूल्य असून महिन्यातून एकदा पूर्वनियोजित तारखांना IPH कर्वेनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत पहिला अवांतर गट 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे या ठिकाणी होणार असून ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. या अवांतर गटामध्ये नावनोंदणी करण्यासाठी 7588098060 या फोन क्रमांकावर व्हाट्सऍप द्वारे इमेल आयडी, फोन नंबर व गटाचे नाव, इ. माहिती देणारा मेसेज पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.