Pune : आयपीएचतर्फे आज विशेष मुलांच्या पालकांचा स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे आज, शुक्रवारी दुपारी 4 ते 6 या वेळेत विशेष मुलांच्या पालकांचा स्वमदत गटविशेष मुलांच्या पालकांचा स्वमदत गट आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आयपीएचतर्फे देण्यात आली आहे. या स्वमदत गटामध्ये ‘विशेष मूल वाढवताना- कुटुंबाची एकवाक्यता व समन्वय या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी आय. पी. एच. तर्फे कर्वेनगर येथील इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ येथे विशेष मुलांच्या पालकांचा स्वमदत गट आयोजित करण्यात येतो. ह्या सत्रात सहभागी होण्यासाठी पालकांनी अन्वय ह्या स्वसहाय्य गटाच्या समन्वयक डॉ.वसुधा गोखले  9657709876 , जयंती गाडगीळ 9822322738 प्रिया शेट्टी 9890658689 ह्यांच्याशी संपर्क साधावा.

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चौथा बंगला ) या ठिकाणी हा स्वमदत गट होणार आहे.

हा स्वमदत गट पूर्णपणे विनामूल्य असून जास्तीतजास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.