Pune : आयपीएच तर्फे बुधवारी कॅन्सर स्वमदत गटाचे आयोजन

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे उद्या, बुधवारी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत कॅन्सर स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी कॅन्सर स्वमदत गटाचे आयोजन करण्यात येते. या बुधवारच्या स्वमदत गटाचा विषय आहे, ‘कॅन्सर शुभार्थींचा आहार’. या विषयावर डॉ. तृप्ती कामत मार्गदर्शन करणार आहेत. डॉ तृप्ती कामत यांची ‘न्यूट्रिशन (पोषण)’ या विषयात Ph.D आहे. त्यांनी पुणे व मुंबई विद्यापीठाअंतर्गत कॉलेजेसमधे अध्यापन केलेले आहे. त्या आहारतज्ञ व मार्गदर्शक आहेत.

_MPC_DIR_MPU_II

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चौथा बंगला ) या ठिकाणी हा स्वमदत गट होणार आहे.

कॅन्सर रुग्ण, ट्रीटमेंट पूर्ण झालेले व कॅन्सर रुग्णाची काळजी घेणारे नातेवाईक अशा सर्व लोकांसाठी हा गट असून जास्तीतजास्त संख्येने या स्वमदत गटाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.