Pune : आयपीएचतर्फे आज कॅन्सर स्व-मदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) व व CARE कॅन्सर सपोर्ट ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज, बुधवारी (दि. 12) कॅन्सर स्व-मदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यायाम प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक आहे. आपले स्नायू सशक्त राहण्यासाठी तर व्यायामाशिवाय पर्यायच नाही. कुठेतरी सुरुवात करायची असते पण ते कसं करावं, काय करावं, हे ठाऊक नसतं. म्हणूनच या स्वमदत गटामध्ये व्यायामाचं महत्व आणि प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.

हा कार्यक्रम इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, प्लॉट क्रमांक 4, यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर ,पुणे येथे संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.