Pune : आयपीएचतर्फे बुधवारी नैराश्य व चिंता स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच)यांच्या वतीने बुधवारी (दि. 21) नैराश्य व चिंता स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थतर्फे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी, आय.पी.एच., पुणे येथे, नैराश्य व चिंता स्वमदत गट जमतो. त्यानुसार बुधवारी (दि. २१) रोजी जमणाऱ्या गटासाठी चर्चेचा व मार्गदर्शनाचा विषय ‘झोपेविषयी बोलू काही’ असणार आहे. याबाबत मनोविकार तज्ञ डॉ. अजित नाईक मार्गदर्शन करतील. या गटातला सहभाग विनामूल्य आहे.

हा कार्यक्रम इनस्टीट्युट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, प्लॉट क्रमांक ४, यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर ,पुणे येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.