Pune : प्रियकराच्या अमानुष छळातून इराणी तरुणीची सुटका ; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज : खोलीत डांबून तरुणीचा मारहाण आणि सिगारेटचे चटके देऊन अमानुषपणे छळ करणाऱ्यास अटक करून पोलिसानी तरुणीची सुटका केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नोव्हेंबर 2018 पासून कोरेगाव पार्क येथील मित ऑलंपस सोसायटी घडत होता.धनराज अरविंद मोरारजी (वय 48, रा. कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर येथे राहणाऱ्या परवीन घेलाची (वय 30) हिने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित तरुणी ही इराणी असून ती पुण्यामध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा कोर्स करण्यासाठी आली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणीमुळे तिची धनराजशी ओळख झाली . त्यानंतर त्याच्यात मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सुरवातीचे काही दिवस दोघेही एकमेकांनसोबत आनंदी होते. पुढे पीडिता धनराजच्या घरी रहायला गेली आणि त्याने तिच्यावर हात उचलायला सुरवात केली.एवढेच नाही तर त्याने पीडितेला त्याच्या घरात कोंडून ठेवले , तिला शिविगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण आणि मानेवर सिगारेटचे चटके देखील दिले.
धनराज घरातून जाण्यापूर्वी पीडितेच्या वस्तू लपवून ठेवत आणि बाहेरून दरवाजा लावून जात असत.

अशाप्रकारे तो पीडितेचा अमानुष पणे छळ करत. अखेर पीडितेला एक संधी मिळाली आणि जवळ असलेल्या फोनवरून तिने इन्स्टग्राम वरून तिच्या मैत्रिणीला मेसेज केला. आणि अखेर तिच्या मैत्रिणीने पोलिसांच्या मदतीने तिची सुटका केली . याप्रकरणी पोलिसांनी धनराजला अटक केली असून पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.