Pune : महाराष्ट्र रायझिंग स्टार किडस फॅशन शोमध्ये इशिता हिरेमठ विजेती

एमपीसी न्यूज – कशिश प्रोडक्शन प्रेझेंन्टस महाराष्ट्र रायझिंग स्टार किडस फॅशन शो सिझन दोन व मिस्टर आणि मिसेस स्पर्धा पुण्यात अण्णाभाऊ साठे सभागृहात झाली. पिंपरी-चिंचवडमधील महाराष्ट्र रायझिंग स्टार किडस फॅशन शो सिझन दोनची विजेती कुमारी इशिता गिरीष हिरेमठ झाली

या स्पर्धेत उपविजेती मिस महाराष्ट्रची विजेती मानसी पवार, किडस मोठ्या ग्रुपमध्ये श्रुती सूर्यवंशी, साची दौंडकर, शौनक शहा तर मिस महाराष्ट्रच्या मानसी पवार, कल्याणी पाटसकर, ज्योती कांबळे, मिसेस महाराष्ट्राच्या पद्ममा स्वामी, नम्रता जंगले, पूजा जलंदर, हर्षा शर्मा विजेत्या झाल्या. ओमकार गाढवे, आकाश कुमार, राहूल बो-हाडे, केतन गायकवाड हे विजेते झाले.

ह्या स्पर्धेसाठी निखिल बहारवाल, उमेश पवार, कुष्णा गायकवाड, प्रकाश यादव, कृष्णा देशमुख, पीएसआय श्रीकांत सांवत, कुलदिप नलावडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे परिक्षण मिसेस रुपाली सावंत, मिसेस मुग्धा देशपांडे, मिसेस भावना शर्मा यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन व कोरिओग्राफपी योगेश पवार व सहकोरिओग्राफी ज्ञानेश्वरी गायकवाड यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.