Pune : इश्कियाना’ मध्ये विविध कलाविष्कारातून उलगडणार प्रेमाचे रंग

एमपीसी न्यूज -एम.जी.एम.च्या वतीने ‘इश्कियाना’ या अनोख्या कला आविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इश्कियाना’ खास कार्यक्रमात प्रेमाचे विविध रंग वैविध्यपूर्ण कलाप्रकारातून उलगडण्यात येणार असून यामध्ये संगीत, गायन, शायरी आणि चित्रकलेचा एकत्रित आस्वाद रसिकांना अनुभवता येईल.

मोनिका सिंग, गायत्री सप्रे ढवळे आणि मृणाल भोंगले या अनुक्रमे शायरी, गायन आणि चित्रकला सादर करणार आहेत. या कलाकारांना अनय गाडगीळ, निनाद सोलापूरकर, आमोद कुलकर्णी आणि रोहन वनगे हे साथसंगत करणार आहेत.‘इश्कियाना’ हा कार्यक्रम 12 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, येथे होणार आहे. “इश्कियाना” चे प्रवेशमूल्य ऐच्छिक ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.