Pune : काँग्रेसमुळेच पुणे शहराला आले भरभराटीचे स्वरूप – रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज – काँग्रेस पक्षाच्या राजवटीतच पुणे शहराला उद्योगनगरी, क्रीडानगरी,आयटीनगरी, उद्याननगरी, महोत्सवाची नगरी असे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून पुणे शहराला भरभराटीचे स्वरूप आले आहे. लाखो तरुण व महिलांना चांगला रोजगार येथे निर्माण झाला. त्यामुळेच पुणे शहराच्या विकासात काँग्रेसचे(Pune) योगदान अमूल्य आहे याची जाणीव सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना आहे. म्हणून ते या लोकसभा निवडणुकीत  महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर(Pune) यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास पुण्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. 

 

याप्रसंगी पुणे लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख व माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, या निवडणुकीतील ही पहिलीच पदयात्रा असून नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मिळत आहे. असेच वातावरण सर्व पुण्यात असून रवींद्र धंगेकर हे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील याची प्रचीतीच या पदयात्रेला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसून येते. निवडणूक  उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज पासून लगेच धंगेकर यांनी पुणे शहरातील मतदारांच्या भेटीगाठीसाठी आपल्या धडाकेबाज पदयात्रांना प्रारंभ केला. आज कसबा विधान मतदार संघात ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करून त्यांची जीप यात्रा / पदयात्रा सुरु झाली व स. प. महाविद्यालय चौक येथे समाप्त झाली त्यानंतर ते बोलत होते. पुण्यातून निवडून गेलेल्या काँग्रेसच्या सर्वच खासदारांनी प्रयत्नांची शिकस्त करून शहराच्या वैभवात भर घातली आहे, याची जाणही पुणेकरांना आहे असे ते म्हणाले. आपणही अशीच दैदिप्यमान कामगिरी करून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Pune : रविंद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांची नेमणूक

प्रारंभी रवींद्र धंगेकर यांनी पुण्याचे ग्राम दैवत श्री. कसबा गणपतीचे दर्शन घेत आरती केली. ढोलताशांचा गजर, रविंद्र धंगेकर यांच्या विजयाच्या घोषणा व फटाक्यांची आतषबाजी, ठिकठिकाणी महिलांकडून धंगेकर यांचे औक्षण, पदयात्रेवर होणारी पृष्पवृष्टी, प्रत्येक घरांतून धंगेकर यांना हात दाखवून भाऊ विजय तुमचाच होणार, असा उत्स्फूर्त प्रतिसाद कसबा विधानसभा मतदार संघातील पदयात्रेत रविंद्र धंगेकर यांना मिळाला.

 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे, पुणे लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख व माजी आमदार मोहन जोशी,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजनान थरकुडे, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी,  डॉ. रोहित टिळक, ज्येष्ठ नेते रविंद्र माळवदकर संगिता तिवारी, निता परदेशी, नाना करपे, गौरव बोराडे, स्वाती शिंदे,  गोरख पळसकर, गणेश नलावडे, दीपक जगताप, रोहन पायगुडे, दीपक पोकळे, अजिंक्य पालकर, अप्पा जाधव,आम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे, धजंजय बेनकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आज दि.(19 एप्रिल) सकाळी 8 वाजता पदयात्रेला सुरुवात झाली त्यांच्यासमवेत काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, आम आदमी पार्टी आणि अन्य मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकार्‍यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.