BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ‘आय.टी. स्किल्स ‘ मेगा शो मध्ये दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार इन्फर्मेशन कम्म्युनिकेशन टेक्नॉलॉजी ऍकेडमी ‘ तर्फे नुकतेच ‘आय .टी . स्किल्स परफॉर्मन्स ‘ मेगा शो आयोजित करण्यात आला होता . त्यामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांनी इन्फर्मेशन कम्म्युनिकेशन टेक्नॉलॉजी कौशल्ये सादर केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी उदघाटन केले. सरहद ‘संस्थेचे संस्थापक संजय नहार, ‘पी ए इनामदार इन्फर्मेशन कम्म्युनिकेशन टेक्नॉलॉजी ऍकेडमी ‘च्या संचालक मुमताज सय्यद, रसिक मित्र मंडळ ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला उपस्थित होते.

कॉम्प्युटर हार्डवेअर ,मोबाईल रिपेरिंग ,रोबोटिक्स,टायपिंग ,टॅली टॅक्सेशन,ग्राफिक्स ,सायबर सिक्युरिटी विषयक कौशल्यांचे सादरीकरण 921 विद्यार्थ्यांनी केले . टॅब आणि एलसीडी स्क्रीन वरून अध्ययन सादरीकरणात 950 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . ‘संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक प्रगतीच्या सर्व संधी शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून मिळाव्यात ,यासाठी संस्था राज्यभर कार्यरत असून गरीब ,मागास विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील प्रगतीची दारे उघडून देण्याचे काम याद्वारे होत आहे. रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जात आहे . शालेय अध्ययन -अध्यापन पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केले जात आहे .’ अशी माहिती डॉ .पी ए इनामदार यांनी यावेळी बोलताना दिली . ‘ऍकेडमी ‘च्या संचालक मुमताज सय्यद यांनी स्वागत केले .

11  एप्रिल रोजी आझम कॅम्पस च्या मैदानावर झालेल्या या मेगा शो ‘ ला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

HB_POST_END_FTR-A4

.