Pune : शहराच्या काही भागात ढगांच्या गडगडाटसह पावसाला सुरुवात

एमपीसी न्यूज – गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटात पुण्यात पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर, धायरी, सिंहगडरोड, वारजे – माळवाडी, शिवणे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढग भरून येत होते. त्यामुळे पुणेकरांना पाऊस येणार असे वाटत असतानाच निराशा व्हायची. मात्र, गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटात पुण्यात पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर, धायरी, सिंहगडरोड, वारजे – माळवाडी, शिवणे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

बाणेर – बालेवाडीत आभाळ भरून आले होते. भरती विद्यापीठ आणि धनकवडी येथे ढगांचा गडगडाट आणि ढगाळ वातावरण झाले आहे. या भागातही पाऊस येण्याची चिन्हे आहेत. मागील 37 दिवसांपासून पुणेकर लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पुणेकर घामाघूम झाले आहेत.

वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट करीत पाऊस सुरू असल्याने पुणेकरांना काही प्रमाणात गारवा मिळाला. तर, जोरात पाऊस सुरू असल्याने शिवणे परिसरातील वीजही गायब झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.