Pune: विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडायला आणखी 15 दिवस लागतील – विवेक खरवडकर 

It will take another 15 days to demolish the flyover at University Chowk - Vivek Kharwadkar

एमपीसी न्यूज – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामात अडचणीचे ठरणारे पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पडायला आणखी 15 दिवस लागणार आहेत, अशी माहिती ‘पीएमआरडीए’चे नियोजनकार विवेक खरवडकर यांनी दिली. 

हे उड्डाणपूल पाडण्याचे 45 टक्के काम पूर्ण केले आहे. पुणे शहारत लॉकडाऊन जाहीर होताच उड्डाणपूल पडायला जोरदार सुरुवात झाली आहे. पाषाणकडे जाणाऱ्या मार्गासह उड्डाणपुलाचा रॅम्प तोडण्याचे काम झाले आहे. मात्र, संपूर्ण उड्डाणपूल पडायला आणखी 15 दिवस लागणार आहेत. 23 जुलैला लॉकडाऊन संपत आहे. आता नव्याने लॉकडाऊन वाढविण्यात येणार नसल्याचे पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, काही प्रमाणात नागरिकांवर बाहेर निघताना बंधने येणार आहेत. मेट्रोच्या कामासाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमुळे वर्दळ कमी आहे. त्यामुळे उड्डाणपूल पाडण्याचे काम वेगात सुरू आहे. शासकीय  तंत्रनिकेतन येथील पुलाचा रॅम्प तोडण्याचे काम जोरात सुरू आहे.  आतापर्यंत ‘पीएमआरडीए’तर्फे उड्डाणपूल पाडण्याचे 45 टक्के काम  पूर्ण झाले आहे. औंध – बाणेरकडे उतरणाऱ्या पुलाच्या बाजू तोडण्याचे काम येत्या आठवड्यात सुरू केले जाणार आहे. ई-स्क्वेअर समोरील पूल पाडण्यासाठी आणखी 15 दिवस लागणार आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर गणेशखिंड व  औंध-बाणेर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक वळविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने हे उड्डाणपूल पाडण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.