Pune : भाजपने तोडफोड नीतीचा वापर करीत बापूसाहेब पठारे यांना नेले- खा. वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत 220 जागा मिळविण्याचा केवळ वलग्ना केल्या आहेत. त्यांच्याकडे एवढे बळ आहे, तर मग विरोधी पक्षांच्या नेत्यांना का घ्यावे लागत आहे ? भाजपने तोडफोड नीतीचा वापर करीत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा पक्ष प्रवेश करून घेतल्याचा हल्लाबोल खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी केला.

वडगावशेरी मतदारसंघातील आमदार जगदीश मुळीक यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणखी जोमाने काम करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उमेदवार सुनील टिंगरे यांच्यासाठी मतदारसंघांत चांगले वातावरण आहे, असे वंदना चव्हाण म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.