Pune : स्वॅब टेस्टिंगकरता जैन संघटना, फोर्स मोटर्सची मदत

एमपीसी न्यूज : शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील संशयित रुग्णाच्या स्वॅब टेस्टिंगचा खर्च जैन संघटना, फोर्स मोटर्स करणार आहेे. पुणे महापालिकेबरोबर आज (गुरुवारी) तसा करार करण्यात आला.

या करारावर भारतीय जैन संघटनेचे विश्वस्त शांतीलाल मुथा, प्रकल्प संचालक सपना सिंग, महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आणि महापालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

प्रतिबंधित क्षेत्रातील तपासणी केलेल्या नागरिकांमधील हाय रिस्क असलेल्या रुग्णांची स्वॅब टेस्ट खाजगी प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. त्याचा खर्च भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स करणार आहे. हे काम महत्त्वाचे असून हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास देशात एक मॉडेल ठरेल, असे शांतीलाल मुथा म्हणाले.

या उपक्रमास महापौर मुरली मोहोळ, आयुक्त शेखर गायकवाड यांचे सहकार्य मिळत असल्याचे मुथ्था यांनी सांगितले.

या करारानुसार प्रतिबंधित क्षेत्रात अधिकाधिक मोबाईल डिस्पेंन्सरी व्हॅन उभ्या करुन वैद्यकीय पथकाद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येईल. त्यांना सर्दी, कफ, ताप यावर औषध देण्यात येईल. वेळ पडली तर स्वॅब टेस्ट करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.