Pune : जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन

एमपीसी न्यूज- जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा देशभरात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. पुण्यात या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, युक्रांत,एफ टी आय आय, इन एस यु आय, लोकायत, या संस्था संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी कॅब आणि एनआरसीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, जामिया विद्यापीठातील विद्यार्थिनींवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा निषेध व्यक्त करत पोलिसच असे कृत्य करत असतील तर विद्यार्थ्यांनी कोणाकडे पहायचे असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. जामिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.