Pune : जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम 370’ रद्द केल्याने गुंतवणूकीसाठी होतेय विचारणा -डॉ. सागर डोईफोडे

एमपीसी न्यूज – जम्मू काश्मीरमध्ये ‘कलम 370’ रद्द केल्यानंतर शैक्षणिक, हॉटेल आणि ऍग्रो प्रोसेसवर गुंतवणूक करण्यासाठी व्यावसायिकांची विचारणा होत आहे, अशी माहिती डोडा जम्मू काश्मीरचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांनी वार्तालाप कार्यक्रमात दिली.

पुणे येथील पत्रकार भवन येथे (सोमवारी, दि. ११,) आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी डोईफोडे यांचे स्वागत केले.

‘कलम 370’ लागू झाल्यानंतर आता पूर्ण परिस्थिती आटोक्यात आणली आहे. त्याला आता 100 दिवस पूर्ण होत आहे. कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी काही उपाययोजना ठेवाव्या लागतात. त्यानंतर एकही दुर्घटना झाली नाही. पाकव्याप्त काश्मीर असला तरी बोलणी होते. डे-टू-डे प्रॉब्लेम सोडविण्यात येतात. या भागात बसेसही सुरू होत्या.

सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाईन ऑफ पॅटर्न ठरवून पुढे जायचे असते. घटनेनुसार पुढे जात आहोत. जम्मू – काश्मीरमध्ये छान टुरिझमचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ऍग्रो आणि सर्व्हिसेसवर त्यांची इकॉनॉमी अवलंबून आहे. या भागातील जमिनीत खरेदी – विक्री कशी करता येईल?, यावर विचार सुरू आहे. सफरचंद एबीसी कॅटेगरीनुसार स्वीकारावा लागला. डोडा जिल्ह्यात मार्केटिंग करावे लागणार आहे. सफरचंद सेन्सेटीव्ह असून ऍग्रोवर प्रोसेस करणाऱ्यांसाठी ‘गोल्डन ऑपॉर्च्युनिटी’ असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उद्योग वाढविण्यासाठी एमआयडीसीसारखी कॉन्सेप्ट राबविण्याचा विचार सुरू आहे. या भागात आता केंद्राचा जमीन अधिग्रहण कायदा लागू झाला आहे. लेह लडाखचे टुरिझम कोन्सेप्ट छान असून पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच चांगल्या सेवा देण्याचाही विचार आहे. शासकीय नोकरीसाठी कागदपत्रांचा निर्णय झाला नाही. ‘रिस्पॉन्सीबिलिटी’ नावाचा प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद असल्याने क्वालिटी एज्युकेशनवर भर देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र नाते आणखी घट्ट व्हावे. उरीमध्ये आपण दीड वर्षाचा कालावधी घालवला. हा दुर्गम भाग असून दीड ते दोन लाख लोकसंख्या आहे. श्रीनगरलाही अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केले. मुलांना विकासात कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न केले. डोडा जिल्ह्यातही असे उपक्रम राबवित आहे. या भागात रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे.

पंचायत राज संस्था स्ट्रॉंग करण्याचे प्रयत्न सुरू असून निवडणुका घेण्यात आल्या. ग्रामपंचायतींना विकासासाठी पैसा दिला जात आहे. नवीन मुले सरपंच होत असल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.