Pune : जावेद हबीब यांच्या हस्ते ‘पै इंटरनॅशनल स्कूल ऑफ हेअर अँड ब्यूटी’ चे उद्घाटन

एमपीसी न्यूज- ‘गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट’ संचालित ‘पै इंटरनॅशनल स्कूल ऑफ हेअर अँड ब्यूटी’ चे उद्घाटन आज शनिवारी दुपारी इंटरनॅशनल हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या हस्ते झाले.

_MPC_DIR_MPU_II

डॉ.पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष एस.बी.एच. इनामदार, उपाध्यक्ष शाहीद शेख , माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर मुनव्वर पीरभॉय (हाजी गुलाम आझम एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष), एस. ए. इनामदार, अब्दुल शेख, शाहिद मुनीर, दानिश खान, युसूफ शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन आरा शेख आणि रुमाना शेख तर प्रास्ताविक वाहिद बियाबानी यांनी केले. अयाज शेख यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.