Pune : दिंडीमध्ये जेसीबी घुसून नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांच्यासह दोघांचा मृत्यू

दिवेघाटात ब्रेक नादुरुस्त झालेला जेसीबी संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात घुसला

एमपीसी न्यूज- संत नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूर येथून आळंदीला जात असताना ब्रेक फेल झालेला जेसीबी पालखी सोहळ्यात घुसून नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला तर या घटनेत 17 वारकरी जखमी झाले. ही घटना आज सकाळी दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर घडली.

या घटनेत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36) अतुल महाराज आळशी (वय 24) यांचा मृत्यू झाला. जखमींवर हडपसरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सर्व वारकरी चहापानासाठी एका ठिकाणी थांबले असताना काही अंतरावर हा जेसीबी उभा होता. जेसीबीचे ब्रेक निकामी असतानाही उतारावरून येत असताना या जेसीबीने एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर काही वारकरी जेसीबी खाली आहे. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे-

विष्णू सोपान हुलवळ (वय 35), शुभम नंदकिशोर आवारे (वय 23), दीपक अशोक लासुरे (वय 19), गजानन संतोष मानकर (वय 20), वैभव लक्ष्मण भराटे (वय 28), अभय अमृत मोकमपल्ले (वय 19), कीर्तिमान प्रकाश गिरजे (वय 23), आकाश माणिकराव भट्टे (वय 30), ज्ञानेश्वर निवृत्तीराव कदम (वय 40), गोरोबा जागडे (वय 35), विनोद लहासे (वय 30), नामदेव पुंजा सगर (वय 34), सोपान म्हाळस्कर (वय 25), गजानन सुरेश मानकर (वय 20), नामदेव पुंजा सगर (वय 34), सोपान नेमिनाथ मासळीकर (वय 25 ), दीपक अशोक लासूरे (वय 19)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.