_MPC_DIR_MPU_III

Pune : जेएनयू मधील हिंसाचाराचे पुण्यात पडसाद ; एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची मध्यरात्री निदर्शने (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात रविवारी(दि. 5) संध्याकाळी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. जेएनयू टीचर्स असोसिएशनने वाढलेल्या शुल्कवाढीसंदर्भात एक बैठक बोलावली होती, त्याठिकाणी जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. या हल्ल्याचे पडसाद मुंबई आणि पुण्यात उमटले. 

_MPC_DIR_MPU_IV

पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर उतरत निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी जेएनयूतील हल्ल्याचा तीव्र निदर्शने करण्यात आला. यावेळी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र आले व कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यातही आज सायंकाळी सात वाजता गुडलक चौकात निषेध सभा होणार आहेत. न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार आहे.

दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात रविवारी संध्याकाळी जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. चेहरे झाकलेले अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. शिक्षकांवरही हल्ला करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तोडफोडही करण्यात आली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. मात्र, दोन्ही संघटनांनी एकमेकांवर दोषारोप केले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे हे पाहताच पोलिसांना पाचारण करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.