Pune : भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये शनिवारी ‘मेगा जॉब फेअर’

Pune : भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये शनिवारी ‘मेगा जॉब फेअर’

एमपीसी न्यूज- भारती अभिमत विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ मध्ये शनिवारी,२५ मे २०१९ रोजी ‘मेगा जॉब फेअर ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत ‘एपीजी लर्निंग्स ‘ च्या सहकार्यांने होणाऱ्या या मेगा जॉब फेअर मध्ये ४० कंपन्या १२०० जॉबच्या संधी घेऊन सहभागी होणार आहेत . बँकिंग ,एचआर ,मॅन्युफॅकचरिंग ,आय टी ,बीपीओ ,सेल्स ,मार्केटिंग अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचा या मेगा फेअर मध्ये सहभाग असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.