Pune Crime : रेल्वे मध्ये टी सी म्हणून नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत पुण्यातील तरुणांची फसवणूक

एमपीसी न्यूज :  मागील काही दिवसांपासून नोकरीच्या अमिषाने तरुणांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.(Pune Crime) त्यात आता टीसी म्हणून नोकरी लावून देण्याच्या अमिषा पुण्यातील दोन तरुणांची तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. 

राजकुमार कांबळे (55) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सुभाष चंद्र कटोच असे या आरोपीचे नाव आहे. 2018 पासून आरोपीने ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांची आरोपी कटोच याच्याशी ओळख एका मध्यास्थाच्या माध्यमातून झाली होती.

Pune News : मुंबई – रीवा आणि पुणे- जबलपूर साप्ताहिक विशेष ट्रेनला मुदतवाढ

फिर्यादी यांच्या मुलीला क्लार्क तर पुतण्याला रेल्वे मध्ये टी सी (तिकीट चेकर ची) ची नोकरी लावून देतो असे आश्वासन कटोच याने दिले होते. विश्वास संपादन करून आरोपीने वेळोवेळी त्या दोघांना दिल्लीतील रेल्वे मुख्यालय जवळ असलेल्या विविध हॉटेल मध्ये बैठक करण्यासाठी बोलावले.(Pune Crime) या कामाला पैसे लागतील असं सांगत आरोपीने 4 वर्षांच्या कालावधीत टप्पाटप्प्याने त्यांच्याकडून 14 लाख रुपये उकळले.

दरम्यान, विश्वास बसावा यासाठी आरोपीने काही बनावट कागदपत्रे देखील तयार केली आणि फिर्यादी यांना दिली. मात्र इतके पैसे देऊन सुद्धा काही काम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.