Pune : पुण्यात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कॉँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज : ऑलंपिक विजेत्या महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यात यावी(Pune) या मागणीसाठी पुण्यातील फर्ग्युसन रोडवर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी बृजभूषण सिंह यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.तसेच यावेळी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.