Pune : राहण्यासाठी योग्य शहर सर्वेक्षणामध्ये पुणेकरांनी सहभाग घ्यावा- महापौर मुरलीधर मोहोळ

पुण्याला मिळालेला पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा' महापौरांचे आवाहन

एमपीसी न्यूज – राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून पुणे शहराला मिळालेला पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणामध्ये पुणेकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.

स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्या सर्वेक्षणामध्ये 114 शहरांचे मूल्यांकन केले जाणार आहे. यात संस्था व प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा, आर्थिक आणि भौतिक संरचना अशा चार श्रेणींमध्ये एकूण 153 संकेतकांच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात येणार आहे. ‘राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर’ म्हणून 2019 मध्ये पुणे शहराला भारतात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या वर्षी मात्र यासाठी ऑनलाईन सर्वेक्षण घेण्यात येत आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे शहरांची क्रमवारी निश्चित करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया 1 ते 29 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.