Pune : पिफ महोत्सव कव्हर करण्यासाठी पत्रकारांना नोंदणीचे आवाहन

एमपीसी न्यूज : येत्या 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान 21 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) पार (Pune) पडणार आहे. ज्या पत्रकारांना सदर चित्रपट महोत्सव कव्हर करण्याची इच्छा आहे, त्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच आपले फोटो पास तयार करून घ्यावेत अशी सूचनाही करण्यात आली आहे. 

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन व सांगता समारंभ कव्हर करण्यासाठी पत्रकारांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून मिळणा-या फोटो पासची गरज नाही. परंतु, चित्रपटगृहात होणाऱ्या कार्यक्रम व कार्यशाळा कव्हर करण्यासाठी पिफचा फोटो पास असणे बंधनकारक असल्याचे आयोजकांनी म्हंटले आहे.

Alandi News : विश्रांतवडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्याची ग्रामपंचायती मार्फत विल्हेवाट

फोटो पाससाठी लागणारी प्रक्रिया – Pune

आयोजकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सदर फोटो पास तयार करण्यासाठी पासपोर्ट आकाराचे २ फोटो आणि आपण काम करत असलेल्या माध्यम संस्थेच्या ओळखपत्राची झेरोक्स प्रत लागणार आहे.

जर पत्रकारांकडे काम करत असलेल्या संस्थेचे ओळखपत्र नसेल तर पिफ कव्हर करणारे पत्र घेऊन येण्याची सोय देखील ठेवण्यात आली आहे. त्यासाठी दोन फोटो सकट कोणत्याही एका फोटो आईडीची (आधरकार्ड, पॅनकार्ड इत्यादी) झेरोक्स प्रत आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रियेविषयीचा तपशील खालील प्रमाणे –

दिनांक – 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी
वेळ – दुपारी 12  ते संध्याकाळी 5  वाजेपर्यंत
स्थळ – सीसी अँड कंपनी, 6 वा मजला (टेरेस), इराणी कॅफे बिल्डींग, लिज्जत पापड शेजारी प्रभात रस्ता, पुणे

पत्रकारांना अधिक माहितीसाठी स्नेहा कांबळे (9552583473) यांचा संपर्क उपलब्ध करून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.