Pune : गायिका जुई धायगुडे-पांडे यांना कै. माणिक वर्मा पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- पुणे भारत गायन समाजातर्फे दिल्या जाणार्‍या कै. माणिक वर्मा पुरस्कारासाठी यावर्षी जयपूर- अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका जुई धायगुडे-पांडे यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 19 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे भारत गायन समाज येथे होणार आहे.

रू. 5000 व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जुई धायगुडे-पांडे या जयपुर गायकीचे श्रेष्ठ गायक व गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या शिष्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.