Pune : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे भाकित’ या विषयांवर आज परिसंवाद
ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज- ‘ज्योतिष ज्ञान दिवाळी अंक प्रकाशन ‘समारंभाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे भाकित’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आज, रविवारी संध्याकाळी 5 वाजता सदाशिव पेठेतील उद्यान कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्योतिषतज्ज्ञ, लेखक वा. ल. मंजुळ व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती प्रतिभाताई शाहू मोडक उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी नवीन वर्ष कसे राहील तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे भाकित या विषयांवर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात सिद्धेश्वर मारटकर, विजय जकातदार व जयश्री बेलसरे सहभागी होणार आहेत.