Pune : कलापिनीचा कै. रजनी धोपावकर स्मृतीपुष्प युवा एकांकिका महोत्सव संपन्न

एमपीसी न्यूज : कै. रजनी धोपावकर स्मृतीपुष्प अंतर्गत कलापिनी (Pune) निर्मित एकांकिका महोत्सव कलापिनी सांस्कृतिक केंद्रात संपन्न झाला. यावेळी धोपावकर ट्रस्टचे कौस्तुभ ओक, उषा पुरंदरे, रंजना दंडवते, नुपूर दंडवते, सिद्धार्थ फ्लोराचे अध्यक्ष उद्योजक शिवाजी भेगडे, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, कार्यकारिणी सदस्य अॅड. श्रीराम कुबेर आदी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.

उषा पुरंदरे म्हणाल्या,” कलापिनीमध्ये नवीन कलाकारांना व्यासपीठ दिले जाते ही कौतुकाची गोष्ट आहे. संस्थेच्या सगळ्या उपक्रमांना माझ्या शुभेच्छा.”

शिवाजी भेगडे म्हणाले, “तळेगावच्या सांस्कृतिक वाटचालीत कलापिनी या संस्थेचं स्थान अनन्यसाधारण आहे. अशा कार्यक्रमांना माझ्याकडून कायमच सहकार्य असेल.”

तीन वेगळ्या विषयावरच्या दर्जेदार एकांकिका महोत्सवात सादर करण्यात आल्या. “फसला माधव दोन्हीकडे” या विनोदी एकांकिकेत आत्म्यात झालेल्या अदला बदलीमुळे उडालेला गोंधळ कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने रंजक पद्धतीने सादर केला. रसिकांनी हशा आणि टाळ्यांनी या एकांकिकेस प्रतिसाद दिला.

विजय पटवर्धन यांचे लेखन आणि मनोज काटदरे यांनी दिग्दर्शन केले होते. पार्श्वसंगीत स्वस्तिक काजे यांचे असून वेशभूषा/रंगभूषा साह्य : मुक्ता भावसार यांचे होते. विराज सवाई यांचे नेपथ्य होते. प्रकाशयोजना स्वच्छंद यांची होती.

Kondhwa : रिक्षा अन् दुचाकी चोरणाऱ्या सराईताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

या एकांकिकेत अविनाश शिंदे, मीरा भरड, मनोज काटदरे, सागर कणसे, प्रतिक मेहता यांच्या (Pune) प्रमुख भूमिका होत्या.

‘तबरूक’ या एकांकिकेत राजकीय स्वार्थापोटी नेते कार्यकर्त्यांना कसे वापरतात, परंतु कार्यकर्त्यांची सद्सद्विवेक बुद्धी जागृत झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊन माणुसकीचे दर्शन कसे घडते हे दाखवण्यात आले होते. राजकीय दबाव, सामाजिक परिस्थिती आणि मानवता याचे अनोखे दर्शन या एकांकिकेत पहायला मिळाले.

या एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन निनाद पाठक यांनी केले होते. संगीत शरण्य अडप यांचे होते. नेपथ्य दिलीप नाईकनवरे यांचे होते. प्रकाशयोजना राहुल यांची होती. सागर यादव, वाहिद, अनंत सताळकर यांच्या भूमिका होत्या.

हुंडा या रूढीवर भाष्य करणाऱ्या ‘विठाई’ या एकांकिकेने रसिक प्रेक्षकांना विचारप्रवृत्त केले. मुलीच्या वडिलांनी कर्ज काढून मुलीचे लग्न लावून द्यायचे आणि मुलाच्या बाजूने हुंड्याच्या प्रथेपोटी पिळवणूक करायची ही पद्धत मोडली जाऊन दोन कुटुंब एक व्हावीत असा सामाजिक संदेश या एकांकिकेत देण्यात आला होता.

कृष्णा यमुना विलास वाळके यांचे लेखन होते. सायली रौंधळ आणि संदीप समर्थ यांनी दिगदर्शन केले होते. प्रणव केसकर आणि शार्दूल गद्रे यांचे संगीत होते. संदीप समर्थ यांची वेशभूषा होती. मुक्ता भावसार यांनी रंगभूषा केली होती. स्वच्छंद यांची प्रकाश योजना होती. भारती जगनाडे, संदीप समर्थ, ह्रितिक पाटील, विद्या अडसुळे, मुक्ता भावसार यांनी भूमिका केल्या होत्या.

ध्वनीसंयोजन सुमेर नंदेश्वर यांचे होते. विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अंजली सहस्त्रबुद्धे यांनी स्वागत केले. डॉ. अनंत परांजपे यांनी प्रास्तविक केले. अॅड. श्रीराम कुबेर यांनी आभार मानले.

प्रतिक मेहता, अनघा बुरसे, चैतन्य जोशी, चेतन पंडित, रश्मी पांढरे, दीप्ती आठवले, दीपाली जोशी, राखी भालेराव, माधवी एरंडे, वेदांग महाजन, अशोक बकरे, श्रीपाद बुरसे, संजय मालकर आदींनी महोत्सवाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.