Pune News : पुणे ते कराड दरम्यान ट्रेनमध्ये  प्रवाशांकडून पैसे वसूल करणार्‍या नकली रेल्वे तिकीट परीक्षकाला पकडले

एमपीसी न्यूज : पुणे ते कराड दरम्यान गाडी क्रमांक (Pune News) 17318 लोकमान्य टिळक टर्मिनस – हुबली एक्सप्रेस मध्ये प्रवाशांकडून पैसे वसूल करत असताना नकली रेल्वे तिकीट परीक्षकला पकडण्यात आले आहे. या बनावट टीसीला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिरजेचे तिकीट निरीक्षक वाय. के. वैष्णव, बी. एम. शेख आणि पी.एस. घाडगे यांच्या सतर्कतेमुळे आणि ही व्यक्ती पोलिसांच्या हाती लागली. पुणे स्टेशनवरून ट्रेन सुटल्यावर ट्रेनमध्ये ड्युटीवर तैनात असलेले तिकीट तपासनीस वाय. के. वैष्णवला काही प्रवाशांनी सांगितले की डब्यातील एक संशयित व्यक्ती त्यांची तिकिटे तपासत आहे आणि पैसे उकळण्यासाठी दबाव आणत आहे.

Pune news : पुणे रेल्वे स्टेशन लेन क्रमांक चार येथून पीएमपीएमएल ची बस सेवा उद्यापासून पूर्ववत

ही माहिती मिळताच वैष्णव यांनी त्याच्या साथीदार शेख व घाडगे यांच्या मदतीने तत्काळ संशयिताला पकडले व वेळ न घालवता नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.(Pune News) कराड स्थानकावरील बनावट टीसी व्यक्तीला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे काम सुरु आहे.

पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर डॉ. मिलिंद हिरवे यांनी प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणत्याही संशयास्पद व्यक्तीकडून तिकीट तपासणे आणि वसुली करण्याबाबतची माहिती त्वरित उपलब्ध रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी रेल्वेला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.