Pune : ‘कर्मा’नं केली भटक्या श्वानच्या खाण्याची सोय

एमपीसी न्यूज लॉकडाऊनमुळं गेल्या काही दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. सरकारी कार्यालय,खानावळी, हॉटेल सर्व काही बंद आहे. त्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालं आहे. जिथं नागरिकांचीच खाण्याची गैरसोय झाली आहे. तिथं भटक्या (श्वान) कुत्र्यांचा विचार न केलेलाच बरा, अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र, पुण्यातील कर्मा फाउंडेशननं अशा परिस्थिती भटक्या कुत्र्यांच्या अन्नासाठी पुढाकार घेतला आहे. या फाउंडेशनंनं आतापर्यंत तब्बल 8 हजारपेक्षा जास्त भटक्या (श्वान)कुत्र्यांना अन्न दिलं जात आहे.

यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून ते माहिती घेतात आणि जिथे भटके कुत्रे आहेत तिथं जाऊन त्यांना खाऊ घालतात. दोन चारचाकी गाड्यांतून शहरासह उपनगरातही त्या कुत्र्यांसाठी अन्न घेऊन जातात.

पूर्वी हॉटेल सुरू असताना या कुत्र्यांना उरलेलं अन्नधान्य खायला मिळत होतं. मात्र, आता ती परिस्थिती राहिली नसल्यानं त्यांची भुकेनं उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी कर्मा फाउंडेशन पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.