Pune : कर्नाटकचा कुख्यात गुंड पर्वती पोलिसांच्या ताब्यात; अनेक महिन्यांपासून कर्नाटकमधून होता फरार

एमपीसी न्यूज : कर्नाटकच्या कुख्यात (Pune) गुंडाला शस्त्रसाठ्यासह आणि त्याच्या दोन साथीदारांसह पर्वती पोलिसांनी स्वारगेट येथून ताब्यात घेतले. धर्मराज चडचंण (डीएमसी) या टोळीचा तो म्होरक्या असून त्याचे नाव मड्डु उर्फ माडवालेय्या हिरेमठ असे आहे. त्याच्या सकट त्याचे दोन साथीदारही ताब्यात घेण्यात आले आहेत. 

माडवालेय्या पंचय्या हिरेमठ (35, रा.कर्नाटक. सध्या रा.उंड्री), सोमलिंग गुरप्पा दर्गा (वय 28, रा. विजापुर) आणि प्रशांत गुरूसिध्दप्पा गोगी (वय 27, रा.कात्रज-कोंढवा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Charholi : देशी बनावटी पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

हिरेमठ गेल्या अनेक महिन्यापासून कर्नाटक मधून  फरार होता. मड्डुवर खून बलात्कार (Pune) याच्यासह डझन भरापेक्षा अधिक गंभीर गुन्हे कर्नाटकात दाखल आहेत. अटक करताना 3 देशी बनावटीचे पिस्तुले, 25 जिवंत काडतुसे, गुन्हयात वापरलेली गाडी आणि 5 मोबाईल असा एकूण 11 लाख 90 हजार रूपयाचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.