Pune: अयोध्येत योगदान देणाऱ्या कारसेवकांचा सत्कार

Pune: Karsevaks felicitated for their contribution in Ayodhya कसबा येथील पतित पावन संघटना व श्री सुंदर गणपती तरूण मंडळ ट्रस्टच्या वतीने अयोध्येत कारसेवक म्हणून अतिशय मोलाचे योगदान देणाऱ्या कारसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

एमपीसी न्यूज – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीतील प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन सोहळ्यानिमित्त कसबा येथील पतित पावन संघटना व श्री सुंदर गणपती तरूण मंडळ ट्रस्टच्या वतीने अयोध्येत कारसेवक म्हणून अतिशय मोलाचे योगदान देणाऱ्या कारसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

राजन काची, शंतनू ठाकूर, विजय राऊत, नंदू वाडेकर, दिलीप गालिंदे, विजय ठकार, अस्तेकर या कारसेवकांचा भाजपचे नगरसेवक अजय खेडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विनायक ठाकूर, योगेश वाडेकर, स्वप्नील आंग्रे, यादव पुजारी, नंदू पवार, रमेश गाडे, दिलीप घोलप, राजू थोरात, प्रदीप गायकवाड, हिरामन जाधव, भूषण ठाकूर आकाश शेरे, विकी पंड्या, तन्मय थोरात आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.