Pune (Karvenagar) : प्रेम प्रकरणातून तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून

एमपीसी न्यूज – प्रेम प्रकरणातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना आज (सोमवार) संध्याकाळी नऊच्या सुमारास पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सिद्धार्थ कलवडी (वय-२५ रा. लक्ष्मीनगर वसाहत, गल्ली नंबर ३, डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये खून झाल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ कलवडी याचे प्रेम प्रकरण होते, याच कारणावरून राहूल सरकार आणि त्याच्या तीन ते चार साथिदारांनी धारदार कोयत्याने वार करुन खून केला,असा प्राथमिक अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.

सिंहगड रोड परिसरात एका तरुणाचा किरकोळ कारणावरुन काल (रविवार) खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आज कर्वेनगर येथे तरुणाचा खून करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.