Pune News : गॅस सिलेंडरच्या भडक्याने वृद्ध दाम्पत्य होरपळले

रात्रभर सिलिंडरमधून गॅस गळती, सकाळी शेगडी पेटवताच उडाला भडका,

एमपीसी न्यूज : आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी शेगडी पेटवताच उडालेल्या भडक्यात वृद्ध दाम्पत्य गंभीररीत्या भाजल्याची घटना घडली. कसबा पेठेतील सात तोटी पोलीस चौकी जवळील एका दहा बाय दहाच्या खोलीत ही घटना घडली. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ठाकरसी त्रिभुवन सोळंकी (वय 89) वसंतबाई ठाकरशी सोळंकी (वय 85) अशी भाजलेल्या दोघांची नावे आहेत. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि गंभीररीत्या भाजलेल्या या वृद्ध दाम्पत्याला तातडीने नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

सोळंकी दाम्पत्य दोघेच या घरांमध्ये राहतात. रात्रीच्या सुमारास गॅस लीक झाल्याने तो रात्रभर घरामध्ये पसरला. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वासंतीबाई सोळंकी यांनी पाणी तापवण्यासाठी शेगडी सुरू केली असता हा भडका उडाला.

जवळच असलेल्या कसबा अग्निशमन विभागाचे जवान सुनील नाईकनवरे, संजय गायकवाड, कुंभार, दळवी आणि वाघमारे या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III