Pune : गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मानाचा पहिला कसबा गणपती विराजमान (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे , जल्लोषाचे वातावरण आहे. कारण सगळ्यांचाच लाडक्या गणपती बाप्पाचं वाजतगाजत आगमन झाले आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज, गुरुवारी घरोघरी आणि प्रत्येक शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होतील. पुण्यातील मनाचा पहिला गणपती असणारा श्री कसबा गणपती मंडळ यांची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी करण्यात आली. तर मानाच्या दुसऱ्या असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीची आज दुपारी साडेबारा वाजता प्राणप्रतिष्ठापना झाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांच्या हस्ते पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी 10 वाजता निघालेल्या कसबा गणपती मिरवणुकीमध्ये देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, श्रीराम, आवर्तन ढोल ताशा पथक आणि प्रभात बँड पथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते.

मानाचा चौथा असलेल्या श्री तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ संस्थान अन्नछत्राचे संस्थापक जन्मेजय राजेभोसले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली.

तांबडी जोगेश्वरी मंडळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.